घरकुल परिसरातील पाणी साचण्याची समस्या कार्यकर्त्यांनी केली दूर
पिंपरी-चिंचवड : पावसानंतर घरकुल परिसरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पाणी साचल्यामुळे ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या, तसेच कचरा साचल्याने परिसरात स्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती.
रहिवाशांची अडचण लक्षात घेऊन नीलेश दादा यांच्या कुशल कार्यकर्त्यांनी कोणतीही हयगय न करता स्वतः पाण्यात उतरून साचलेला कचरा व घाण साफ केली. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक कार्य करून जलजमावाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे आणि समाजसेवेच्या भावनेमुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला.
या उल्लेखनीय समाजसेवी कार्याबद्दल घरकुल परिसरातील रहिवाशांनी सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन काम करण्याची गरज असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशनच्या वतीनेही समाजहितासाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सूर्य प्रकाश पाण्डेय
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशन
अपना राज्य चुनें
अंडमान और निकोबार द्वीप समूह
बिहार
छत्तीसगढ़
दिल्ली
हरियाणा
हिमाचल प्रदेश
जम्मू और कश्मीर
झारखंड
मध्य प्रदेश
राजस्थान
उत्तर प्रदेश
उत्तराखंड