महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीत भक्तिमय वातावरणात गणेश आरती संपन्न
पिंपरी-चिंचवड : महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त सायंकाळची आरती भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी दिगंबर शिंदे यांच्या हस्ते श्री गणपती बाप्पांची आरती करण्यात आली.
आरतीच्या कार्यक्रमाला सोसायटीतील इमारतीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती, पूजा-अर्चना आणि गणपती बाप्पांच्या जयघोषामुळे संपूर्ण इमारतीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सर्व रहिवाशांनी एकत्र येत गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना केली.
गणपती बाप्पांची कृपादृष्टी महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीतील सर्व कुटुंबांवर सदैव राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशन
सूर्य प्रकाश पाण्डेय
अपना राज्य चुनें
अंडमान और निकोबार द्वीप समूह
बिहार
छत्तीसगढ़
दिल्ली
हरियाणा
हिमाचल प्रदेश
जम्मू और कश्मीर
झारखंड
मध्य प्रदेश
राजस्थान
उत्तर प्रदेश
उत्तराखंड