गणपती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था; घरकुल टाउन हॉल परिसरातच विसर्जन करण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घरकुल टाउन हॉल परिसरात विशेष विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश भक्तांनी पर्यावरण व स्वच्छतेचा विचार करून महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जनाच्या वेळी परिसरात गर्दी होऊ नये तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशमूर्तीचे विसर्जन नियोजित ठिकाणीच करून विसर्जन परिसर स्वच्छ ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी, अशी विनम्र विनंती करण्यात आली आहे.
“स्वच्छता अभियानाला हातभार लावूया, गणरायाला भक्तिभावाने निरोप देऊया” असा संदेश देत सर्व गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी घरकुल फेडरेशन ऑफ गुरुकुलचे अध्यक्ष अशोक जगन्नाथ मगर यांनी सर्व गणेश भक्तांना सहकार्य करण्याचे आवाहन करत “गणपती बाप्पा मोरया!” या शुभेच्छा दिल्या.
मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशनचे रिपोर्टर सूर्य प्रकाश पाण्डेय जी यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, ही मंगलकामना.
अपना राज्य चुनें
अंडमान और निकोबार द्वीप समूह
बिहार
छत्तीसगढ़
दिल्ली
हरियाणा
हिमाचल प्रदेश
जम्मू और कश्मीर
झारखंड
मध्य प्रदेश
राजस्थान
उत्तर प्रदेश
उत्तराखंड